Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा- अक्राणी विधानसभेत चौरंगी लढत; २ माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Nandurbar News : अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसच्या गड मानला जातो. या मतदारसंघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी हे निवडून येत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत पाडवी यांनी निसटता विजय मिळवला असला तरी या मतदारसंघात त्यांचा दबदबा आजपण कायम
Akkalkuwa Vidhan Sabha
Akkalkuwa Vidhan SabhaSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यातील क्रमांक एकचा मतदार संघ असलेल्या अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून के. सी. पाडवी अक्कलकुवा विधानसभेचे आमदार आहेत. या मतदारसंघात यावेळी सर्वाधिक चुरस पाहायला मिळत असून दोन माजी मंत्री, एक माजी खासदार तर एक विद्यमान विधान परिषद आमदार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असून या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसच्या गड मानला जातो. या मतदारसंघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी हे निवडून येत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत पाडवी यांनी निसटता विजय मिळवला असला तरी या मतदारसंघात त्यांचा दबदबा आजपण कायम आहे. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या चिरंजीव गोवा पाडवी यांना उभ करत निवडून आणलं. दोन टर्म खासदार असलेल्या डॉ. हिना गावित यांचा पराभव करत १ लाख ५९ हजार मतांनी गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आले असले तरी ते किती दिवस टिकणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Akkalkuwa Vidhan Sabha
Yogi Adityanath : योगींचा 'बटेंगे तो कटेंगे' अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रभावी ठरणार का? उद्या होणार योगींची सभा


लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार हिना गावित आता थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असून   माजी मंत्री असलेल्या के. सी. पाडवी यांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी त्यांनी डॉ. हिना गावित यांनी अक्कलकुवा- अक्राणी विधानसभेतून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे शिवसेनेला सुटली असून विद्यमान विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांना महायुती गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभेत काँग्रेसला मदत केल्याने हिना गावित यांचा पराभव झाला. यामुळे ही जागा भाजपला द्यावी; अशी मागणी या गावीत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र तरीदेखील ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली. यामुळे हिना गावित यांनी भाजप सदस्यताचा आणि राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णय निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

Akkalkuwa Vidhan Sabha
Nagpur News : नागपूर मविआमध्ये बिघाडी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांचा प्रचार

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मुलाला उमेदवारी न देता शिवसेना शिंदे गटांनी त्यांनाच महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषित केल्याने महायुतीत अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे. २०१९ मध्ये आमश्या पाडवी हे शिवसेनेचे उमेदवार होते. त्यावेळी मात्र थोड्याफार फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या ३५ वर्षांपासून के. सी. पाडवी हे आमदार आहेत. मात्र या भागाचा त्यांनी कोणताही विकास केलेला नाही आदिवासींना न्याय मिळाला नाही; म्हणूनच मी विधानसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केला असल्याचं आमश्या पाडवी यांनी सांगितलं.

माजी मंत्रींचेही आव्हान 
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री असलेले पद्माकर वळवी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपा प्रवेश केला. मात्र काही दिवसातच त्यांनी भाजपालाही रामराम करत पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे के. सी. पाडवी यांच्याशी मतभेद असल्याने त्यांनी थेट के. सी. पाडवींना आवाहन देत त्यांच्याच मतदारसंघातून आदिवासी पार्टीच्यावतीने उमेदवारी करत आहेत. पद्माकर वळवी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचीच डोकेदुखी वाढणार आहे. याचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com