Nandurbar News: अंगणवाडी सेविकेने संपविले जीवन; मिटींगमधून परतताना घाटात उडी

अंगणवाडी सेविकेने संपविले जीवन; मिटींगमधून परतताना घाटात उडी
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

मोलगी (नंदुरबार) : तीन वर्षापासून मोबदला नाही, अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरविलेला पोषण आहाराची (Poshan Aahar) खर्चित रक्कम मिळाली नाही. शिवाय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रास व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने घाटात उडी घेत आत्महत्या केली. (Maharashtra News)

Nandurbar News
Ajit Pawar: ५० खोके एकदम ओके म्हटले की त्यांना राग येतो; अजित पवार यांची सरकारवर खोचक टीका

धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात तेथीलच रहिवासी अलका अमिताभ वळवी (वय ३३) ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता. पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिला. अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास व गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी (Nandurbar News) मयत महिलेचे पती अमिताभ जोमा वळवी यांनी केली आहे.

मिटींग ठरली अखेरची

एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मिटींग घेण्यात आली. ही मिटींग करुन गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली, त्यामुळे ही मिटींग तिच्यासाठी अखेरची ठरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com