नंदूरबारच्या कलेक्टरचा नवा पायंडा,खेड्यातल्या अंगणवाडी कलेक्टरची मुलं

Breaking Stereotypes: नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवा पायंडा पाडलाय.. आपली मुलं चक्कं सरकारी अंगणवाडीत पाठवली आहेत.
Nandurbar Collector Mitali Sethi with her twins at the government anganwadi, promoting equal education for all children.
Nandurbar Collector Mitali Sethi with her twins at the government anganwadi, promoting equal education for all children.Saam Tv
Published On

या नंदूरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी... आणि त्यांचा सत्कार होतोय त्याला कारण आहे त्यांनी पाडलेला नवा पायंडा...कारण जिल्हाधिकारी मिताली सेठींनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश कुठल्या हायफाय शाळेत नाही तर नंदूरबारपासून 4 किलोमीटर लांब असलेल्या टोकर तलाव येथील सरकारी अंगणवाडीत केलाय.. त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतूक होतंय..

हा व्हिडीओ नीट पाहा... ना कुठला बडेजाव... ना कुठली मिजास... आपल्या मुलांना अंगणवाडीत इतर सर्वसामान्य गरीबांच्या मुलांसोबत एकत्र बसवून त्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय.. कारण जिल्हा परिषद शाळा आणि सरकारी अंगणवाडीत आपल्या मुलांना पाठवणं अनेक अधिकाऱ्यांना कमीपणाचं वाटतं.. मात्र आता जिल्हाधिकारी मिताली सेठींनी मुलांना सरकारी अंगणवाडीत पाठवण्यामागे काय कारण आहे.. ऐका त्यांच्याच तोंडून....

राज्यात जवळपास 14 हजार शाळा पटसंख्येअभावी अखेरच्या घटका मोजत आहेत.. अनेक पालक आपल्या मुलांना खासगी इंग्लिश मिडीयम शाळेत पाठवत आहेत.. अशा परिस्थितीत कलेक्टर मिताली सेठींनी आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीत पाठवण्याचा घेतलेला निर्णय कौतूकास्पद आहे.. त्यांचं अनुकरण इतर अधिकाऱ्यांनी केल्यास आणि शाळांचा दर्जा सुधारण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास पुन्हा जिल्हा परिषद, महापालिकांच्या शाळांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत... हे मात्र निश्चित..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com