नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या 18 गटांसाठी 35 उमेदवार तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात माघारी अंती शिवसेनेचा Shivsena उमेदवार बिनविरोध झाल्याने त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणुकीचे By Election चित्र भाजप BJP विरुद्ध महा विकास आघाडी असे पाहायला मिळत आहे.
हे देखील पहा -
माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्येने कोळदे गटातून राजकारणात पदार्पण केले आहे, तर आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या भगिनीने खापर गटातून भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्याविरुद्ध जोरदार टक्कर दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांनी पुन्हा कोपरली गटातून निवडणूक लढवली आहे त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये कोण वर्चस्व राखेल हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.