Nandigram Express: रेल्वेच्या शौचालयात आढळलं स्त्री जातीचं जिवंत अर्भक; नंदीग्राम एक्स्प्रेसमधील धक्कादायक घटना

Nandigram Express News: प्रवाशांना बाळ रडतानाचा आवाज आल्याने ट्रेन थांबल्यावर आरपीएफ जवान आणि पोलिसांकडून शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला.
Nandigram Express
Nandigram ExpressSaam TV
Published On

लक्ष्मण सोळुंके

Jalna News:

जालन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल्वेच्या शौचालयात पाच दिवसांचं स्त्री जातीचं जिवंत अर्भक सापडलंय. हे अभ्रक ट्रेनमध्ये आणि तेही शौचालयात कोणी ठेवले याचा पोलीस शोध घेतायत.

Nandigram Express
Pune Crime : पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; प्रियकरासोबत छत्तीसगडवरून गाठलं होत पुणे

बुधवारी रात्री ही घटना घडली. नंदीग्राम एक्स्प्रेस जालना रेल्वे स्थानकावर आल्यावर रेल्वे शौचालयात एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. प्रवाशांना बाळ रडतानाचा आवाज आल्याने ट्रेन थांबल्यावर आरपीएफ जवान आणि पोलिसांकडून शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला.

दरवाजा उघडताच पोलीस आणि प्रवासी हडबडले. कारण आतमध्ये एक चिमुकली मुलगी रडत होती. त्यानंतर पोलिसांनी या अर्भकाला जिल्हा आणि महिला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलं. सध्या चिमुकलीची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी म्हंटलंय.

राज्यात स्त्री भृण हत्येवर बंदी आहे. मुलींबाबत नागरिकांच्या मनात चांगले विचार असावेत. मुलींना जन्म द्यावा, त्यांचे पोलनपोषण करून मोठं करावे यासाठी शासनामार्फत अनेक योजना आणि शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र अद्यापही लोकांची मानसिकता आणि विकृती पूर्णता संपलेली नाही.

अशा प्रकारे स्त्री जातीचं जिवंत अर्भक आतापर्यंत अनेक ठिकाणी आढळलंय. वंशाला दिवा असावा आणि वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच असं अनेक जण मानतात. मुलगीही आपलं घर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालवू शकते या गोष्टी अद्यापही अनेकांना समजलेल्या नाहीत, अशी परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतेय.

Nandigram Express
Dhule Crime: पिकअप वाहन पळवणाऱ्या चोरट्याला धुळे पोलिसांनी अवघ्या २४ तासात ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com