Nanded: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाताच्या कॅबीनमधील साहित्य जप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाताच्या कॅबीनमधील साहित्य जप्त
Nanded Medical Collage
Nanded Medical CollageSaam tv
Published On

नांदेड : नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील साहित्य जप्त करण्यात आलेय. महाविद्यालयांसाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा ९५ लाखांचा मावेजा मिळाला नाही; म्हणून शेतकऱ्याने (Farmer) न्यायालयात धाव घेतली होती. त्‍यानुसार न्यायालयाच्या आदेशावरुन ही नामुष्की ओढवली आहे. (nanded news Materials seized from the cabin of the dean of a nanded government medical college)

Nanded Medical Collage
धुळे ब्रेकिंग..सुत गिरणीला आग; लाखोचा कापूस खाक

विष्णूपुरी परिसरात भव्य असे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) आणि रुग्णालय आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी १९९७ मध्ये नागेश कुलकर्णी या शेतकऱ्याची जमीन भुसंपादन करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना शासनाकडून समाधानकारक मोबदला मिळाला नाही, म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने कुलकर्णी यांना मोबदला देण्याचे आदेश दिले होते.

महाविद्यालयात नामुष्‍की

मोबदला मिळावा म्हणून खंडपीठाच्या आधीन राहून नांदेडच्या न्यायालयाने कुलकर्णी यांना मोबदला म्हणून ९४ लाख ८१ हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने काल न्यायालयाने कुलकर्णी यांच्या सोबत बेलीफ देऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताच्या कॅबीनमधील खुर्च्या टेबल आणि इतर साहित्य जप्त केले. 200 एकरमध्ये पसरलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजही दरमहा देखभालीसाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. शेतकऱ्याचा मोबदला दिला असता तर ही जप्तीची नामुष्की ओढवली नसती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com