Nanded Accident News
Nanded Accident NewsSaam tv

Accident News: नवस फेडायला जाणाऱ्या भाविकांच्‍या टेम्पोला अपघात; 25 जण जखमी

नवस फेडायला जाणाऱ्या भाविकांच्‍या टेम्पोला अपघात; 25 जण जखमी
Published on

नांदेड : नवरात्री असल्‍याने नवस फेडायला जात असलेल्‍या भाविकांचा टेम्पो उलटून अपघात (Accident) झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. हा अपघात नांदेडच्‍या (Nanded) किनवट तालुक्यातल्या शिवणीजवळ आज सकाळी झाला. (Nanded Accident News)

Nanded Accident News
Electric Bike: इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

हदगाव तालुक्यातील हस्तरा येथील भाविक तेलंगणातील आडेला देवीचा नवस फेडण्यासाठी टेम्पोतून जात होते. दरम्‍यान आज सकाळी शिवणी जवळ चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटून झालेल्या (Accident News) अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच स्थानिक गावकऱ्यांनी मदतकार्य राबवत जखमींना हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात (Hospital) पाठविले.

१४ गंभीर

अपघातातील 11 जखमींवर सध्या हिमायतनगरच्या रुग्णालयात तर 14 गंभीर जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com