Online Betting: क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा; किराणा दुकानातून चालू होते काम

क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा; किराणा दुकानातून चालू होते काम
Online Betting
Online BettingSaam tv

नागपूर : होलसेल किराणा दुकानाच्या आडून ऑनलाइन क्रिकेट बॅटिंगचा अड्डा सुरू होता. हा अड्डा चालवणाऱ्या व्यापाऱ्याला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली. प्रकाश टोपनदास कृष्णानी अस या आरोपी नाव आहे. त्याने पाच लाखाचा सट्टा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड मॅचवर (Cricket Match) लावला होता. त्याला ऑन लाईन बेटिंग करताना रंगेहात पकडण्यात आले. (Letest Marathi News)

Online Betting
Jalgaon: दूध संघ निवडणुक; उमेदवारी अर्जासाठी आज अंतिम मुदत

नागपूरातील (Nagpur) होलसेल किराणा दुकान आहे. या दुकानातून दुकानचालक गेल्या दोन वर्षापासून सट्टा लावत असल्याचा उघड झाले आहे. कृष्णानी हा नियमितपणे ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट मॅचवर (Online Betting) सट्टा लावत असतो. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीसानी सापडा रचत त्याच्यावर कारवाई केली.

आयडी देणारा फरार

मॅचसाठी ऑनलाईन आयडी देणारा सुद्धा नागपुरातीलच असून त्याच्या घरी सुद्धा पोलिसांनी धाड टाकली. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. कृष्णानी याला आता पोलिसांनी अटक केल्यानंतर या ऑनलाइन सट्टा बाजारात आणखी कोणाचे हात गुंतले आहे, याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. कृष्णानी हा आपल्या होलसेल किराणा दुकानाच्या आडून हा धंदा करत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com