Nana Patole On Akola Clash: 'असा महाराष्ट्र कधीच पहिला नव्हता', अकोला हिंसाचारावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

Akola Clash: नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी अकोला हिंसाचार प्रकरणावरुन सरकारवर टीका केली.
Nana Patole News
Nana Patole NewsSaam Tv

संजय डाफ, नागपूर

Nagpur News : अकोल्यातील हिंसाचाराच्या (Akola Clash) घटनेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली आहे. 'महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा महाराष्ट्र कधीच पहिला नव्हता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र, काय चालले आहे महाराष्ट्रात', अशा शब्दात नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nana Patole News
Trimbakeshwar Temple News: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, सत्य शोधण्यासाठी समितीची स्थापना

नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी अकोला हिंसाचार प्रकरणावरुन सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की,'महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वस्तुस्थिती माहीत करण्यासाठी आणि त्याठिकाणी आहे कोण याची माहिती घेण्यासाठी मी अकोला येथे जात आहे. लोकांनी संयमाने आणि शांतीने राहण्याचे आवाहन करणार आहे.'

Nana Patole News
Bailgada Sharyat: आज ठरणार बैलगाडा शर्यतीचं भवितव्य, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष

तसंच, 'राज्यात सत्तेचा वापर आणि दुरुपयोग केला जात आहे. असा महाराष्ट्र कधीच पहिला नव्हता. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. काय चालले आहे महाराष्ट्रात.', असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. 'महाविकास आघाडीत जे व्हायचे ते होईल मात्र जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे. जनतेचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे. भाजप सत्ता पिपासू आहे. साम दाम दंड भेद करून सत्ता मिळविण्याची भूमिका भाजप सरकारची आहे. सरकार झोपा काढत आहे का?,' असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. 'महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघावर आमचं लक्ष आहे. कर्नाटकप्रमाणेच किंबहुना अधिक ताकदीने आम्ही लढणार आहोत.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Nana Patole News
Cabinet Reshuffle: मोठी बातमी! किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून हटवलं, मोदी सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, अकोल्यातील जुने शहरात 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. दोन गटात झालेल्या वादात जमावाकडून दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील अर्ध्याहून अधिक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर 300 पेक्षा जास्त जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com