Nagpur Gangster: जामिनावर बाहेर आला अन् कांड केलं, रील स्टार सुमितची पुन्हा तुरूंगात रवानगी

Nagpur: नागपूरचा कुख्यात गुंड सुमित ठाकूर जामिनावर बाहेर आल्यानंतर "बाप तो बाप रहेगा" गाण्यावर रील बनवून व्हायरल केली, ज्यामुळे जामिनाच्या अटींचा भंग झाला आणि त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली.
जामिनावर बाहेर आला अन् कांड केलं, रील स्टार सुमितची पुन्हा तुरूंगात रवानगी
जामिनावर बाहेर आला अन् कांड केलं, रील स्टार सुमितची पुन्हा तुरूंगात रवानगीGoogle
Published On

नागपूरचा कुख्यात गुंड सुमित ठाकूर हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. मकोका मध्ये जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रील बनवणे त्याला चांगलेच भोवले आहे. यानंतर पुन्हा त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली.

ऑक्टोबर 2023 मध्ये नागपूरमधील जरीपटका येथील थावरे कॉलनीत कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी पिस्तुलच्या धाकावर तीन तरुणांचे अपहरण केले होते. या प्रकरणात सुमित ठाकूर आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामिनावर बाहेर आला अन् कांड केलं, रील स्टार सुमितची पुन्हा तुरूंगात रवानगी
Crime : धक्कादायक! चंद्रपूरमध्ये खाकीवर हल्ला, टोळक्यानं पोलीस कर्मचाऱ्याची केली हत्या

सुमित ठाकूर हा तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता, परंतु त्याच्या रिहायशीनंतर तुरुंगाच्या बाहेर अनेक गुन्हेगार त्याला घेण्यासाठी पोहोचले होते. सुमित ठाकूर आणि त्याचे साथीदार गाड्यांच्या ताफ्यातून तुरुंगाच्या बाहेर निघाले. त्याच्या साथीदारांनी "बाप तो बाप रहेगा" या गाण्यावर आधारित एक रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, सुमित ठाकूरने सोशल मीडियावर रील तयार केल्या, ज्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची माहिती पुन्हा चर्चेत आली. या रीलच्या व्हायरल होण्यावरून, सुमित ठाकूरवर पोलीसांनी जामिनाच्या अटींचा भंग केल्यामुळे त्याचा जामिन रद्द केला आणि पुन्हा त्याची तुरुंगात रवानगी केली.

Edited By - Purva Palande

जामिनावर बाहेर आला अन् कांड केलं, रील स्टार सुमितची पुन्हा तुरूंगात रवानगी
Crime News: जगण्यापेक्षा मरण बरं..; ६७ वर्षांच्या वृद्धाने मृत्यूला कवटाळलं, ५ व्या मजल्यावरून मारली उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com