Nagpur: जिल्हा परिषदेत 'फाईल ट्रॅकर'; भ्रष्टाचाराला बसणार आळा

सरकारी काम आणि महिनाभर थांब, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे.
Nagpur: जिल्हा परिषदेत 'फाईल ट्रॅकर'; भ्रष्टाचाराला बसणार आळा
Nagpur: जिल्हा परिषदेत 'फाईल ट्रॅकर'; भ्रष्टाचाराला बसणार आळासंजय डाफ
Published On

संजय डाफ

नागपूर : सरकारी काम आणि महिनाभर थांब, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात विलंब होत असल्यानं सामान्य नागरिकांचे काम वेळेत होत नाही. यावर नागपूर जिल्हा परिषदेनं Nagpur Zilla Parishad ‘फाइल ट्रॅकर’च्या File Tracker माध्यमातून तोडगा काढला आहे. यामुळं फाईल्स कुठं आणि का अडल्या आहे, याची माहिती मिळेल. परिणामी कामं लवकर मार्गी लागतील आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसेल. ही प्रणाली लावणारी नागपूर जिल्हा परिषद पहिली आहे.

हे देखील पहा-

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटल जात. ग्रामीण भागाशी संबंधित शासनाचे जवळपास सर्वच विभाग याठिकाणी कार्यरत आहे. रोज शेकडा नागरिक कामासाठी येतात. शिवाय कर्मचाऱ्यांशी संबंधित फाइलही असतात. अनेकदा चिरीमिरीसाठी फाईल्स दाबून ठेवल्या जातात. विशेषतः पंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी फाइल मुख्यालयात पाठविल्याचे सांगून वेळ मारून नेतात. प्रत्यक्षात फाइल मुख्यालयात येतच नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. या प्रकारावर आळा घालण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी फाइलला ट्रॅकर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता फाइल एका विभागात किती वेळ राहिली याची माहिती मिळते.

Nagpur: जिल्हा परिषदेत 'फाईल ट्रॅकर'; भ्रष्टाचाराला बसणार आळा
Yavatmal: दागिने लुटून केला महिलेचा खून? शेतात सापडला मृतदेह!

प्रत्येक फाइलला बार कोड Bar Code लावण्यात आला आहे. ट्रॅकरच्या माध्यमातून बार कोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होईल. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद होईल. यामुळे फाइल किती दिवस संबंधित विभागात राहिली त्याची नोंद राहील.

राज्यात अनेक संस्था, कार्यालय आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजकल्याण, आदिवासी, सिटी सर्वे आदी विभागात कामासाठी नागरिकांना बराच त्रास होतो. नागपूर विभागात ट्रॅकरच्या माध्यमातून फाइलवर लक्ष ठेवणारी जिल्हा परिषद ही पहिलीच संस्था आहे. त्यामुळं नागरिकांचे काम खरच वेळेत करायचे असेल तर या प्रणालीचा वापर होण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com