CBI अधिकाऱ्याने मागितले ५ लाख रुपये: कुटुंबाला संशय येताच फिरवला फोन, त्यानंतर...

अश्विनला जर या प्रकरणातून वाचवायचं असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV
Published On

नागपूर: नागपूर (Nagpur) मध्ये दोन तोतया लोकांनी आपण सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून, एका कुटुंबाला धमकी देत ५ लाख रुपये मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील मानकापूर पोलीस (Mankapur Police Station) ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता.

या अपघात प्रकरणामध्ये अश्विन शंभरकर याचं नाव असून तो या प्रकरणात फसला आहे. जर अश्विनला या प्रकरणातून वाचवायचा असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी या तोतया अधिकाऱ्याने केली होती.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातामध्ये अश्विन शंभरकर याचे नाव आहे. शिवाय अश्विन या प्रकरणात फसला आहे. हे सांगण्यासाठी उज्वल देवतळे नावाच्या व्यक्तीने शंभरकर कुटुंबीयांच्या घरी गेला आणि अश्विनला जर या प्रकरणातून वाचवायचं असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.

शंभरकर कुटुंबीयांनी त्या अधिकाऱ्यांला त्यांच्या पदाविषयी विचारलं असता, त्याने आपण CBI अधिकारी असल्याचं सांगितलं. मात्र, घरच्यांना उज्वल देवतळेवर संशय आला. आपण खरेच अधिकारी असल्याचं पटवून देण्यासाठी त्यांने आपल्या दुसऱ्या सहकार्याला फोन करत, 'हे लोक तपासात सहकार्य करत नाही असं सांगितलं .

Nagpur Crime News
उठल्याबसल्या राजकारण हा बालिशपणा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपला टोला

त्याच्या या फोनमुळे शंभरकर कुटुंबियांचा संशय जास्तचं बळावला आणि त्यांनी आरोपीला एका खोलीमध्ये बंद करत. पोलिसांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. शिवाय पोलीस पोहचण्याआधी देवताळेचा दुसरा सहकारी प्रकरण मिटवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला होता. तोपर्यंत कपिल नगर पोलीस शंभरकर कुटुंबियांच्या घरापर्यंत पोहोचले आणि दोन्ही तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com