Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam Tv

Nagpur News: सिगारेटचे चटके, मारहाण... दांपत्याकडून ७ वर्षीय मुलीचा अमानुष छळ; नागपुरातील संतापजनक प्रकार

Nagpur Latest News: दांपत्य घराबाहेर गेल्यानंतर मुलीने आरडा- ओरडा करत मदत मागितल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून सध्या चिमुकलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published on

Nagpur Crime News: घरी काम करणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीला सिगारेटचे चटके देत दांपत्याने अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरमध्ये समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी मुलीला घरात कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेले. ज्यानंतर मुलीने आरडा- ओरडा केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून सध्या चिमुकलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Uttar Pradesh Crime News
Shambhuraj Desai : काेयना धरणाच्या पाणी पातळीने चिंता वाढली, आमदारांच्या मागण्यांबाबत शंभूराज देसाईंनी दिले वचन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिपळा फाटा-बेसा रोडवरील अथर्व नगरीतील एक सदनिका दुबईत (Dubai) राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर आहे. त्यामध्ये एक दाम्पत्य भाड्याने राहतात. त्यांनी ७ वर्षीय मुलगी काम करण्यासाठी पंजाब-हरियाणा येथून आणली आहे. त्या मुलीकडून हे पती- पत्नी घरातील सर्व कामे करून घेतात.

हे दांपत्य मुलीला सिगारेटचे चटके देवून, मारहाण करत तिचा अमानुष छळ करायचे. गेल्या चार दिवसांपूर्वी हे दाम्पत्य सदनिकेला कुलूप लावून बंगळुरूला निघून गेले. त्यांनी घरातील बाथरूममध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होते. तिला खायला काही ब्रेडचे पाकीट ठेवले होते. (Nagpur News)

Uttar Pradesh Crime News
Sachin Tendulkar यांच्या घरासमाेर Bacchu Kadu यांचे आंदाेलन; भान ठेवून वागा ! नितेश राणेंनी काेणाला दिला सल्ला

सदनिकेचे वीज बिल न भरल्यामुळे बुधवारी (३०, ऑगस्ट) काही कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले. त्यांना खिडकीतून चिमुकली हात बाहेर काढून मदत मागत असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले आणि मुलीला बाहेर काढले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com