Nagpur Corona Update: नागपूर विभागात कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, जिल्ह्यातील पॅाझिटीव्हीटी रेट 21 टक्क्यांखाली

नागपूर जिल्ह्यातील पॅाझिटीव्हीटी रेट 21 टक्क्यांच्या खाली आलाय.
Nagpur Corona
Nagpur Corona Saam tv
Published On

नागपूर: नागपूरसह पूर्व विदर्भातील नागरीकांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वेगानं कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट पिकवर असताना नागपूर जिल्ह्यात 44.84 पॅाझिटीव्हीटी रेट होता. सध्या नागपूर जिल्ह्यातील पॅाझिटीव्हीटी रेट 21 टक्क्यांच्या खाली आलाय.

Nagpur Corona
Sharad Pawar Beats Covid19 : शरद पवारांची कोरोनावर मात, पवारांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

नागपूरप्रमाणे (Nagpur) भंडारा (Bhandara) जिल्ह्यात पिकवर असताना 30 टक्के पॅाझिटीव्हीटी रेट होता. आता 11 टक्क्यांवर आलाय. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात 35 टक्क्यांवरचा पॅाझिटीव्हीटी रेट 11 टक्क्यांवर आलाय. आरोग्य उपसंचालकांनी ही माहिती दिलीये.

Nagpur Corona
Union Budget 2022 : कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरली ! आर्थिक पाहणी अहवालात निष्कर्ष समोर

त्यामुळे ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. मात्र, तरीही ही कोरोनाची (Corona) लाट पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा करु नये, कोव्हिड नियमांचं (COVID Restrictions) पालन करावं, लसीकरण करुन घ्यावं असं आवाहनही आरोग्य उपसंचालकांनी केलंय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com