आर्थिक गुन्हे शाखा
आर्थिक गुन्हे शाखाSaam Tv

नगर अर्बनचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेकडे

Published on

अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या येथील शाखेत बनावट सोने तारण ठेवून केलेल्या फसवणूकप्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह १५९ कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी बँकेच्या शाखेत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. फसवणुकीची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने, हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. यामुळे कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे. त्यातही एकाच घरातील पती-पत्नी, पिता-पुत्रांचा समावेश आहे. Nagar Urban scam to the Financial Crimes Branch for investigation

आर्थिक गुन्हे शाखा
पुत्रासाठी माय लढली बिबट्यासोबत...

(मंगळवारी) पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी बँकेच्या शाखेत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या संदर्भातील चौकशीसाठी लागणारे कागदपत्रे शाखेतून हस्तगत केली. गैरव्यवहारातील रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. Nagar Urban scam to the Financial Crimes Branch for investigation

दरम्यान कालपासून कर्जदार खातेदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक जण नॉट रिचेबल झाले आहेत. या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी कायदेशीर सल्लामसलती सुरू झाल्या आहेत. शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल आहुजा, बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा यांच्याकडे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी प्राथमिक चौकशी केली. अर्बन बँकेच्या नगर मुख्य शाखेतील सहायक व्यवस्थापक व चौकशी अधिकारी मनोज फिरोदिया चौकशीस उपस्थित राहिले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com