उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील एका ऑटो रिक्षा चालकाने auto rickshaw driver तब्बल एक लाख 9 हजार रुपयांची रक्कम व्यापा-यास परत करुन माणसुकी हरवलेली नाही हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. स्वतःच्या रिक्षात एका व्यापा-याची विसरलेली बॅग संतोष तुपसुन्दर्य याने शहरातील नेहरु चौकात असलेल्या उल्हासनगर वाहतूक पोलिसांच्या चौकात नेऊन दिली. त्याच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. (nagar-police-feliciated-autorickshaw-driver-returned-lakh rupees-trader-trending-news)
उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 भागात नीरज ब्रिजलानी यांचे कपड्याचे दुकान आहे. त्यांनी दूध नाका भागातून एका व्यापाऱ्याकडे कपडे घेतले. त्यानंतर रिक्षाने ते आपल्या दुकानाच्या इथे आले. त्यांनी कपडे असलेल्या पिशव्या रिक्षातून उतरवून ते आपल्या दुकानात गेले. परंतु पैसे असलेली सॅक घेण्यास ते विसरले. त्यांनी दुकानात सॅकची शाेधाशाेध केली परंतु त्यांना सापडली नाही. काही वेळानंतर रिक्षा चालक संताेष याच्या लक्षात आले कोणीतरी प्रवासी आपल्या रिक्षात बॅग विसरला आहे. त्याने ती बॅग पाहिली. त्यात खूप पैसे असल्याचे पाहून ताे घाबरला. दिवसभरात अनेक प्रवासी रिक्षात बसले हाेते मग ही बॅग कोणाची असेल ? कोणाला देऊ ही बॅग या विचारात रात्रभर संतोष हाेता. त्याने ती बॅग आपल्याकडे सांभाळून ठेवली.
दरम्यान दुस-या बाजूने व्यापाऱ्याने पैशांची बॅग हरवली म्हणून पाेलिसांत धाव घेतली. तेथे पाेलिसांना त्यांना रिक्षाचालकाने ज्या भागात उतरवलेल्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे, वाहतूक पोलिस जितू चव्हाण यांच्या मदतीने तपासले. त्यांनी रिक्षाचा क्रमांक शोधला. संबंधित रिक्षा ही उल्हासनगर स्टँडची असल्याने रिक्षा चालक संताेष याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता. संताेषने देखील हाे बॅग माझ्याकडे आहे असे सांगून कुठे घेऊन येऊ असा प्रतिसाद दिला. संताेषने पैशांनी भरलेली बॅग वाहतूक शाखेत श्रीकांत धरणे यांच्याकडे सुपुर्त केली.
पोलिसांचं कर्तव्य आणि रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामूळे व्यापाऱ्याला आपले एक लाख नऊ हजार रुपये परत मिळाले. रिक्षा चालक संतोषच्या प्रमाणिकपणाचा यावेळी पाेलिस दलाने सत्कार केला. दरम्यान आपल्या मेहनतीचा पैसा हा आपल्यासाठी खूप आहे. या पैशांमुळे रात्री झोप लागली नाही अशी भावना रिक्षाचालक संतोष तुपसुन्दर्य याने व्यक्त केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.