शिवाजी चौक नाही...छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं; नगरपालिकेनं झळकावले बॅनर

यापुढे महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेने होर्डिंग्जस लावून नागरिकांना आवाहन केले आहे. आता या होर्डिंग्जसची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
Aurangabad Hoarding
Aurangabad Hoardingडॉ.माधव सावरगावे
Published On

औरंगाबाद - फक्त शिवाजी महाराज म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, यावर अनेकदा चर्चा झाली. पण औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर (Gangapur) नगरपालिका प्रशासनानेच ठणकावून सांगितल आहे, नुसतं शिवाजी चौक म्हणायचं नाही; तर छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणायचं. या आशयाचे होर्डिंग्जस (Hordings) गंगापूर शहरात लागल्यानं पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. (municipality flashed Banners in Aurangabad Gangapur)

हे देखील पहा -

ज्यांना इतिहास माहीत असतो, त्यांचे भविष्य उज्वल असतं, असं सातत्याने आपण सांगत असतो. आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते देशाला स्वातंत्र्य मिळावण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास आहे. त्यांचे कार्य, त्यांचे कर्तृत्त्व हा इतिहास भविष्यातल्या पिढ्यांना माहीत व्हावा, त्यांच्यासमोर महापुरुषांचा आदर्श असावा, प्रेरणा असावी म्हणून देशभरात महापुरुषांचे पुतळे उभारले गेले.

रस्ते, गावं, चौक, वस्त्या, ठिकाणं, शाळा, कॉलेज, इमारतींना नावे दिली गेली. मात्र अनेकदा या रस्त्यांचा,चौकांचा एकेरी नामोल्लेख केला जातो. आपल्या स्वार्थासाठी हितासाठी कधीकधी महापुरुषाचा अवमान करणारे महाभाग आपल्या समाजात आहेत. मात्र, आता यापुढे महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेने होर्डिंग्जस लावून नागरिकांना आवाहन केले आहे. आता या होर्डिंग्जसची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

Aurangabad Hoarding
Collarwali Tigress: ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघीणाचा मृत्यू

गंगापूर नगरपालिकेने गंगापूर शहरातील सर्व चौकात, रस्त्यांवर वेगवेगळ्या महापुरुषांचा सन्मान आदर राखण्यासाठी आणि त्यांची प्रेरणा मिळावी यासाठी होर्डिंग लावले आहेत. त्यात लासूर नाका नाही तर हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असेच म्हणायचे, असे बॅनर लावले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com