बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे उमेदवारी भारतीय जनता पक्षाने नाकारल्यानंतर, बीडमधील (Beed) भाजप कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. जाणून बुजून पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे मुंडे भगिनींना डावललं जात असल्याचा आरोप समर्थक करत आहेत.
तसंच जो पाच वर्षाला पक्ष बदलतो, त्याला आमदारकी खासदारकी दिली जाते, ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही, नगरसेवक होण्याची लायकी नाही त्याला केंद्रीय मंत्री केल जातं, हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा ? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील पाहा -
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आदेश दिला तर रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी मुंडे समर्थकांनी दिला आहे. बीडच्या केज तालुक्यातील चींचपुर येथिल हनुमान मंदिरात, हनुमान चालीसा वाचन (Hanuman Chalisa) करत भाजप पक्षश्रेष्ठींना सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडेही या कार्यतर्त्यांनी घातलं तसंच यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी तीव्र घोषणाबाजी करत पक्षावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली असती तर त्यांना विरोधी पक्षनेते पदही द्यावे लागले असते. मुंडे यांचा राज्यभरात कार्यकर्त्यांचा संच आहे. त्यांनी संघर्ष यात्रा काढली असती तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला असता. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली नसल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.