Manoj jarange Patil On Maratha Reservation:
Manoj jarange Patil On Maratha Reservation: Saamtv

Manoj Jarange Patil: ६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

Manoj jarange Patil On Maratha Reservation: 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सिद्धेश म्हात्रे, मुंबई|ता. १४ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. ना उमेदवार दिलाय, ना कोणाला पाठिंबा दिला. मात्र 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे.

"महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून ७ महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की त्यांचं की सांगता येत नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj jarange Patil On Maratha Reservation:
Lok Sabha Election : अजित पवारांना मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

त्याचबरोबर "मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे," अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

Manoj jarange Patil On Maratha Reservation:
BR Ambedkar Jayanti 2024 : फटाक्यांच्या आतिषबाजीने भीम जयंतीचा जल्लोष; देशभरात उत्साहाचं वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com