कबुतरखाने बंदीवरुन नवाच वाद पेटला; आरोग्य की श्रद्धा?

BJP Leaders React Differently To Kabutarkhana: मुंबईतील कबुतरखाने बंद केल्याने नवा वाद पेटलाय... तर भाजपमध्येही कबुतरखाने बंद करण्यावरुन मतभेद समोर आलेत...
Civic staff sealing a kabutarkhana in Mumbai after HC orders, triggering political and religious unrest.
Civic staff sealing a kabutarkhana in Mumbai after HC orders, triggering political and religious unrest.Saam Tv
Published On

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले.. मात्र कबुतरांना खायला न मिळाल्याने कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय.. मात्र कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय...

एकीकडे कबुतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केलाय... तर मंत्री लोढांनीही याच संघटनांशी मिळती जुळती भुमिका घेतल्याने मनसेने तिखट प्रतिक्रीया व्यक्त केलीय...

मात्र याप्रश्नी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेत..

ब्रिटीश काळापासून मुंबईत काही सामाजिक आणि धार्मिक महत्व असलेले तब्बल 51 कबुतरखाने आहेत...मात्र या कबुतरांना खायला टाकण्यामुळे मुंबईत कबुतरांची संख्या वाढत आहे.. तर यामुळे नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय....

न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत.. तसेच त्यांना खायला टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाचा आदेश पाळून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणार की धार्मिक संघटनांच्या रेट्यापुढे झुकणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com