Big Breaking- अकरावी प्रवेशाची सीईटी मुंबई हायकोर्टाकडून रद्द

अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले.
Big Breaking- अकरावी प्रवेशाची सीईटी मुंबई हायकोर्टाकडून रद्द
Big Breaking- अकरावी प्रवेशाची सीईटी मुंबई हायकोर्टाकडून रद्द Saam tv news
Published On

मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशाची सीईटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यसरकारला मोठा दणका बसला आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता अकरावी प्रवेश कसे होणार? तोडगा कसा काढायचा? असे एक ना अनेक प्रश्न राज्यसरकारपुढे निर्माण झाले आहेत. (Mumbai High Court canceled CET exam for 11th admission)

Big Breaking- अकरावी प्रवेशाची सीईटी मुंबई हायकोर्टाकडून रद्द
Maratha Reservation: मराठा समाजाने शांततापूर्व मार्गाने आंदोलने केली, पण...

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी घेण्याचा राज्य सरकारचा २८ मे रोजीचा जीआर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने रद्दबातल केला. याशिवाय, अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र २८ मे रोजी एक अध्यादेश सादर करत अकरावी प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर निकाल देत न्यायालयाने सीईटी परिक्षांचा निर्णय रद्द केला आणि दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्याचे आदेश दिले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com