Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक
Crime News
Crime NewsSaam tv

संजय गडदे

मुंबई : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्यास गुन्हे (Crime) शाखा कक्ष 11 ने अटक केली आहे. दहिसर पूर्वेकडील ज्ञानेश्वर नगर कोकणी पाडा परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Crime News
पत्नीच्या आजारपणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण ती... पतीनं उचललं टोकाचं पाऊल पाऊल

रविवारच्या दिवशी साधारणपणे बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी अमान याने अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीस फूस लावून (Crime News) पळवून नेले असल्याची तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केली. आरोपीने या अल्पवयीन मुलीच्या गालावर किस करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

आरोपीने केला गुन्‍हा कबूल

वांद्रे पोलीस (Police) ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली. आरोपी दहिसर पूर्वेकडील कोकणी पाडा ज्ञानेश्वरनगरमध्ये असल्याचे गुन्हे शाखा कक्ष 11 यांना समजले. यानंतर तांत्रिक माहिती आणि मानवी कौशल्याच्या जोरावर अमन या आरोपीस अटक करून कार्यालयात आणले. चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आता त्याला पुढील तपास कामासाठी वांद्रे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com