Supriya Sule : ही 'महाराष्ट्रची हास्ययात्रा' नाही'; सुप्रिया सुळेंचा चंद्रकांतदादांना टाेला

तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का ?
MP Supriya Sule , MLA Chandrakant Patil
MP Supriya Sule , MLA Chandrakant Patilsaam tv

Supriya Sule : एका मंत्री जेंव्हा बोलतो तेव्हा त्याला लाईटली घ्यायचं नसतं, चेष्टा करायची नाही. गंमत जंमत करायचा अधिकार तुम्हाला नाही. महाराष्ट्रची हास्य यात्रा नाही. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला असा खरमरीत इशारा खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (chandrakant patil) यांनी दिला. (supriya sule latest marathi news)

महाराष्ट्रातील सर्व खासगी शाळांचे पगार सरकारने केले तर तुम्ही फी कमी करणार का ? असं वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची. शक्य अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायचे आहे कारण वक्तव्य त्यांनी केल आहे. (Maharashtra News)

MP Supriya Sule , MLA Chandrakant Patil
Supriya Sule : शंभूराज देसाईंच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळे दुःखी

जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असतील की सर्व खाजगी कॉलेजच्या शिक्षकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का ? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का ? असा प्रश्न करीत सुळेंनी उठ सुठ महाराष्ट्रातील मंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे असेही म्हटले. (Tajya Batmya)

MP Supriya Sule , MLA Chandrakant Patil
Love : अख्या साता-यात रंगलीय त्याच्या प्रेमाची चर्चा

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी त्यांनी आर्थिक नियोजन केलेलं दिसत आहे. असं असेल तर मी जावून त्यांचा सत्कार करेन असे सुळेंनी चंद्रकांत पाटलांचं नाव न घेता टाेला लगावला.

Edited By : Siddharth Latkar

MP Supriya Sule , MLA Chandrakant Patil
Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com