साखर कारखाना
साखर कारखाना

राज्यात राहुरी विद्यापीठाचाच ऊस, ९० टक्के वाणांची लागवड

Published on

अहमदनगर : राज्यामध्ये ऊस लागवडीखाली १० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ९० टक्के क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसीत ऊस वाणांखाली आहे. राज्यामध्ये एकूण २०० साखर कारखाने आहे. त्यांची वार्षिक उलाढाल २५ हजार कोटी आहे. यामध्ये १५ हजार कुशल व अकुशल कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त या कारखान्यांना ऊस तोडण्यासाठी १०-१२ लाख मजूर राज्यातील कोरडवाहू भागातून येत असतात.

या मजूरांना वर्षातील सहा महिन्यांचा शाश्वत रोजगार उपलब्ध होतो व ग्रामीण भागाचा विकास झालेला दिसून येतो. या कारखान्यांना उसाचे चांगले संशोधीत वाण जे अधिक उतारा देतील अशा वाणांची आवश्यकता असते. हा ग्रामीण भागाचा आर्थिक गाडा सक्षमपणे चालविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील निर्मित ऊस वाण महत्वाची भूमिका बजावत आहेत.Most of the sugarcane varieties of Rahuri University are cultivated in Maharashtra abn79

साखर कारखाना
हे प्रेम होतं का फक्त शरीरसंबंधासाठी साधलेली जवळीक

आत्तापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनातून ऊसाचे अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे १४ वाण प्रसारीत केले आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण उसाच्या क्षेत्रापैकी सन २०१९-२० मध्ये को ८६०३२ या वाणाखाली ४८.४९ टक्के क्षेत्र, फुले २६५ या वाणाखाली ३४.२२ टक्के क्षेत्र, फुले १०००१ या वाणाखाली ४.१७ टक्के क्षेत्र, को ९२००५ या वाणाखाली ३.६७ टक्के क्षेत्र असे एकुण ९०.५५ टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या वाणांखाली आहे.

शेतकऱ्यांना मिळाले १३२४६८ कोटी

या वाणांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रु. १३२४६८ कोटी दिले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसीत केलेले फुले २६५ या वाणाने या क्षारपड जमिनीमध्ये ऊस उत्पादनात क्रांती केली. यामुळे ऊस आणि साखर उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या वाणांमुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती उंचविण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या घरांना ऊस वाणाचे नांव दिलेले आहे. या ऊस वाणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात गोड क्रांती आली आहे.

को ८६०३२ वाण

यापूर्वी सन १९९६ साली पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधित केलेला को ८६०३२ हा वाण मध्यम उशिरा पक्व होणारा, अधिक उत्पादनक्षमता, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, रोग व कीड प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करणारा, पूरबूडीत क्षेत्रात तग धरणारा आणि अनेक खोडवे देवू शकणारा वाण शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या पसंतीस पडला आहे. या व्यतिरिक्त विद्यापीठाने विकसीत केलेले फुले १०००१, को ९२०५ या उसाच्या वाणांखाली क्षेत्र वाढत आहे.

- कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील ऊस संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे.

- डॉ.शरद गडाख, संशोधन संचालक : आजपर्यंत ऊस संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी उसाचे १४ उन्नत वाण आणि १०२ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत केलेल्या आहेत. या विकसीत वाणांमुळे ऊस उत्पादकांमध्ये आर्थिक स्थैर्य आलेले आहे.Most of the sugarcane varieties of Rahuri University are cultivated in Maharashtra abn79

डॉ. भारत रासकर, ऊस विशेषज्ञ : पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने गेल्या ८८ वर्षात ऊस संशोधनाचे भरीव कार्य केले आहे. या केंद्राद्वारे राज्यातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या गरजेनुसार अनुवंशीकदृष्टया शुध्द मुलभूत बियाणे हे पायाभुत बेणे निर्मितीसाठी देण्यात येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com