कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North By-Election) भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्हीबाजूचे मोठे नेते प्रचारासाठी येऊन गेले आहेत. दरम्यान काल या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात आली असून उद्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशातच आज कोल्हापूरातील भाजपाच्या (BJP) माजी नगरसेविकेच्या (Corporators) कार्यालयात पैशांची पाकिटे सापडल्याची घटना समोर आली आहे.
हे देखील पहा -
दरम्यान, ही पैशाची पाकिटे सापडल्या प्रकरणात पोलिसांनी भाजपाच्या (BJP) काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी नगरसेवक सुनंदा मोहिते यांच्या मंगळवार पेठ पदमावती परिसरातील कार्यालयात प्रचार पत्रके, पैशांची पाकिटे सापडल्याने पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी ही बातमी समोर आल्याने याची कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरु आहे.
Edited By -Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.