मुलीला होस्टेलमध्ये सोडण्याच्या बहाण्याने केला विनयभंग; राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

घरातून होस्टेलला घेऊ जाण्याच्या बहान्याने होस्टेल संचालक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने त्याच्याच होस्टेलमध्ये दहावीच्या वर्गात शिकण्याऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
NCP Leader
NCP LeaderSaam TV
Published On

भंडारा : घरातून होस्टेलला घेऊ जाण्याच्या बहाण्याने होस्टेल संचालक असलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्याने त्याच्याच होस्टेलमध्ये दहावीच्या वर्गात शिकण्याऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघड़ झाली असून ह्या प्रकरणी होस्टेल संचालक असलेल्या आरोपी सुमेद श्यामकुवर वर आंधळगाव पोलिसांनी बाल लैगिक अत्याचार (Child sexual abuse) प्रकरणीचा गुन्हा नोंद केला आहे.

काय घडला नेमका प्रकार -

पीड़ित मुलगी भंडारा (Bhandara) शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या यशोधन ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित महिला समाज गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत असून घटनेच्या दिवशी दिनांक 25 फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास आरोपी राष्ट्रवादीच्या नेत्याने (NCP Leader) पीड़ित मुलीच्या वडिलांना फ़ोन करत आपण मुलीला होस्टलमध्ये परत नेन्यासाठी आलो असल्याचे सांगत. तो असणाऱ्या ठिकाणी मुलीला सोडायला सागितलं. स्वत: होस्टेल संचालकच मूलीला घ्यायला आल्याने वडिलांनी विश्वासाने आरोपी असलेल्या ठिकाणी मुलीला पोहचवलं आरोपीने पीडिताला आपल्या चारचाकी गाडीतून घेऊन जात असतांना सुनसान जागी गाड़ी थांबवत पीड़ित अल्पवयिन मुलीचा विनयभंग केला.

NCP Leader
जयंत पाटलांनी कोल्हेंना दिली सचिन वाझेची भुमिका, स्वत:ला अनिल देशमुखांची

होस्टेलमध्ये पोहचताच पीडित मुलीने सर्व हकीकत आपल्या मैत्रीनीला सांगितली ,अखेर मैत्रीणीने पीडिताच्या वडिलांना फ़ोन करत सर्व घडलेली घटना सांगितली असता वडिलांनी आंधळगाव पोलिस स्टेशन गाठत आरोपी सुमेद श्यामकुवर विरोधात बाल लैगिक अत्याचार विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मात्र या घटनेमुळे गर्ल्स हॉस्टेल (Girls Hostel) सारख्या ठिकाणी मूली सुरक्षित राहत नसेल तर इतर ठिकाणी मुलींची स्थिती कशी असेल अशा प्रश्न पालक विचारत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com