Mokhada News
Mokhada NewsSaam tv

Mokhada News : रस्तावर दरड पडल्याने कुर्लोद मार्ग बंद; ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्ता केला मोकळा

Mokhada Shahapur News : बांधकाम विभागाकडून बनविण्यात आलेल्या रस्त्याचे काही वर्षातच खराबी झाली आहे. आता रस्त्यावर दरड कोसळत असल्याने मार्ग पूर्णपणे बंद होऊन नागरिकांची अडचण होत आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे
Published on

फैय्याज शेख 

मोखाडा : नव्याने करण्यात आलेला रस्ता बनविताना संबंधित ठेकेदाराकडून योग्य ती काळजी घेतली नाही. याचा त्रास आता रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे. कारण या रस्त्यावर दरड कोसळली असून यामुळे कुर्लोद गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. यानंतर रस्ता मोकळा करण्यासाठी स्वतः ग्रामस्थानीच पुढाकार घेत दरड बाजूला करण्याचे काम करत आहेत. 

कुर्लोद ग्रामपंचायतीच्या अनेक गाव पाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नव्हता. आजारी रूग्ण व गरोदर महिलांना डोली करून रूग्णालयाला घेऊन जावे लागत होते. हे भयान वास्तव्य बातम्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे शासन खडबडून जागे होते. यानंतर तातडीने या रस्त्याला निधी उपलब्ध करून दिला. रस्त्याचे काम देखील ठेकेदाराकडून करण्यात आले होता . मात्र रस्ता बनवताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतली गेली नाही यामुळे अखेर रस्त्यावर दरड कोसळली व रस्ता बंद झाले होते  

Mokhada News
Nagpur Crime : दारूच्या व्यसनाने वडिलांचा मृत्यू; संतापातून मुलगा बनला चोर, वाईन शॉप केले टार्गेट

रस्ता बनविला पण.. 

मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या आदिवासी पाड्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये; म्हणून शासनाने तातडीने पुल व रस्ता मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला होता. या नंतर रस्ता देखील पूर्णपणे बनविण्यात आला. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने व छोट्या मोठ्या टेकड्यातून रस्ता बनविताना ठेकेदारांने जी काळजी घेणे आवश्यक होती, ती काळजी न घेतल्याने अखेर या रस्त्यावरील दरड कोसळली व रस्ता पुर्ण पणे बंद झाला. 

Mokhada News
Nanded : धक्कादायक प्रकार; मनोरुग्ण मुलाला शेतातील झोपडीत ठेवले बांधून, ग्रामस्थांना त्रास देत असल्याने आईनेच घेतला निर्णय

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 

दरम्यान रस्त्यावर कोसळलेल्या दरड बाबत मोखाडा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. मात्र बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. रस्त्यावरील दरड असल्याने नागरिकांना येथून जाणे कठीण झाले होते. यामुळे अखेर कुर्लोद ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांना एकत्र येत कोसळलेली दरड बाजूला करून रस्ता मोकळा करून घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com