Mohit Kamboj: 'त्या' हॉटेलमध्ये मध्यरात्री मोहित कंबोज नेमके कशासाठी गेले होते? स्वतःच केला खुलासा

संजय राऊतांच्या आरोपांवर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
Sanjay Raur And Mohit Kamboj
Sanjay Raur And Mohit KambojSaam Tv
Published On

Mohit Kamboj on Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकीय वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत एक व्हिडिओ ट्विट करता मोठा दावा केला होता. मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला होता. पण आता संजय राऊतांच्या या आरोपांवर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raur And Mohit Kamboj
Prithviraj Chavan News: मानाचं स्थान राहील ! शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

यावेळी मोहित कंबोज म्हणाले, हे ठिकाण एक फॅमिली हॉटेल होतं, ज्याला डान्सबारच नाव देण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. माझी चूक आहे की मी उशिरा दीड वाजता हॉटेलमध्ये गेलो. पण वाढदिवस असल्याने गेलो होतो. काहीजण आमच्या मागे गाडीचा पाठलाग करत होते. त्यावेळी सचिन कांबळे आणि त्यांची लोक हॉटेलमध्ये आले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली.

घाटकोपर, चेंबूरच्या बाहेरचे लोक वांद्र्यात शस्त्र घेऊन का फिरत होते? ते तिथं काय करत होते? त्यांनीच रेस्तराँमध्ये येऊन धिंगाणा घातला, याची पोलिसांनी चौकशी करावी. तसेच संजय राऊत प्रत्येक वेळी अशा गोष्टीत कसे समोर येतात, त्यांचे या लोकांशी काय संबंध आहेत? याचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली. (Maharashtra Politics)

संजय राऊत वेडे झाले आहेत - मोहित कंबोज

संजय राऊत (Sanjay Raut) वेडे झाले आहेत ते जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञकडे दाखवावं लागेल. संजय राऊत कुठे जातात कुठ राहतात काय खातात? हे बाहेर काढायला लावू नका? महागात पडेल? ग्रँड हयातमध्ये जाऊन काय करता याच व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मला खालच्या स्तरावर जाऊन बोलायला लावू नका.

जर वैयक्तीकरित्या कुटुंबियांवर अशा प्रकारचे आरोप करणारं राजकारण महाराष्ट्रात सुरु असेल तर मी जेव्हा व्हिडिओ समोर आणेल तेव्हा महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या मुलांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही मी कोणाच्या कुटुंबात हस्तक्षेप करत नाही पण माझ्यावर चुकीचे आरोप केले जात असतील तर मी शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी कंबोज यांनी दिला.

Sanjay Raur And Mohit Kamboj
Sharad Pawar Retirement: साहेब, तुम्हाला परस्पर निर्णय घ्यायचा अधिकार नाही; जयंत पाटलांना रडताना पाहून शरद पवारांच्याही डोळ्यांत पाणी

कंबोज यांनी सांगितला घटनाक्रम

कंबोज म्हणाले, मोईन सलीम शेख नावाची व्यक्ती आम्ही होतो त्या रेस्तराँमध्ये आली तेव्हा त्याच्याकडं रिव्हॉल्वर होतं. पण त्याला माहिती नव्हतं की, मला मुंबई पोलिसांची सिक्युरीटी आहे. ही व्यक्ती आल आल्यानंतर माझे सुरक्षा पोलिसही आतमध्ये आले, तेव्हा ते तिथून फरार झाले. त्याचवेळी खार पोलीसही तिथं दाखल झाले, त्यावेळी या रेस्तराँमध्ये २ वाजून २० मिनिटांनी मी माझ्या बायकोसोबत तिथं खुर्चीवर बसलो होतो.

एक गाडी समोर आली असून त्यात काही अज्ञात लोक होते जे माझ्यावर ट्रॅप लावून बसले होते. ही गाडी मोईन शेखच्या नावावर आहे. त्याच्यासोबत सचिन कांबळे, मोईन शेख आणि अज्ञात लोकही होते. मोईन शेखकडं एक रिव्हॉल्वर होतं हे लोक जसे पळाले त्याचवेळी रात्री मुंबई पोलिसांनी वेगानं वाहन चालवताना त्यांच्यावर चलान कापलं. त्यानंतर खार पोलिसांनी रेस्तराँवरही नियमभंग केल्याप्रकरणी चलान कापलं, त्यानंतरआम्ही तिथून निघून गेलो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com