गावात मोबाइलचे टॉवर 'दोन' तरीही लागेनात 'फोन'

तुळजापूर तालुक्यातील किलज गावामध्ये दोन मोबाइल कंपनीचे टॉवर आहेत मात्र ते वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
गावात मोबाइलचे टॉवर 'दोन' तरीही लागेनात 'फोन'
गावात मोबाइलचे टॉवर 'दोन' तरीही लागेनात 'फोन'Saam Tv

आजकाल अत्यावश्यक गोष्टींच्या यादीमध्ये अन्न वस्त्र निवारा आणि मोबाइल फोन 'विथ-इंटरनेट' असा पायंडा पडला आहे आणि कोरोनामुळेCorona पडलेल्या लॉकडाऊनमुळेLockdown तर सर्व काही ऑनलाईन कारभारच सुरु झाला आहे. त्यामुळे आता मोबाईल असेल तर फुल नेटवर्कMobile Network सुध्दा हवयं नाहीतर समुद्रात असून पाणी पिता येत नाही अशी तऱ्हा होते.असाच प्रकार तुळजापूर तालुक्यातील किलज गावात घडला आहे कारण गावात दोन जोन मोबाईल टॉवर असूनही गावावाल्यांच्या मोबाईल मध्ये नो इंटरनेट सिग्नल आहे.Mobile towers in village 'two' still not range

हे देखील पाहा-

तुळजापूरTuljapur तालुक्यातील किलज KIlaj गावामध्ये असलेले मोबाइल कंपनीचे टॉवर वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. गावात इंटरनेट Internet साठी आवश्यक ते नेटवर्क नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सर्वांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे सध्या काही ठिकाणी शाळा सुरू आहेत तर काही मुलांच्या शाळा अजूनही मोबाईलवर भरवल्या जात आहेत मात्र नेटवर्क प्रॉब्लेम आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास(ONline Study करताना अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे गावाबाहेर जाऊन अभ्यास करावा लागतो आहे किलज येथे दोन मोबाईल टॉवर आहेत त्यापैकी एक टॉवर बंद अवस्थेत असून उर्वरित एका टॉवरवरून ग्राहकांना सेवा पुरवली जाते मात्र ही सेवा सुरळीत होता नाही तसेच धिम्या गतीने नेटवर्क चलत असून अशा समस्यांमुळे कॉलिंगसह मोबाइल इंटरनेट सेवेत व्यत्यय येत आहे त्यामुळे दोन टॉवर असूनही त्याचा उपयोग काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com