दिव्यात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी; मनसेने घेतला आक्रमक पवित्रा

दिव्यातील वाहनचालकांना साहसी चालकांचा दर्जा द्या,मरण पावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना तातडीने दहा लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
Diva News
Diva News saam tv
Published On

MNS News in Marathi : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि ठाणे महापालिका हद्दीतील दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथे खड्डे असल्यामुळे गणेश फाले(वय 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.याचे सीसीटीव्ही समोर येताच मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेत दिव्यातील प्रभाग समिती कार्यालय गाठत सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले आणि जाब विचारला.मात्र सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्याकडून ठोस उत्तर न मिळाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी दिव्यातील वाहनचालकांना साहसी चालकांचा दर्जा द्या,मरण पावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना तातडीने दहा लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Diva News
जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा अमोल मिटकरींवर गंभीर आरोप; म्हणाले, निधीसाठी कमिशन...

मनसेने आक्रमक पवित्रा घेत दिव्यातील प्रभाग समिती कार्यालय गाठत सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले आणि जाब विचारला.मात्र अपघात घडला हे माहिती नसल्याचे उत्तर सहाय्यक आयुक्तांनी दिले.त्यामुळे मनसे कार्यकर्ते यांनी सहाय्यक आयुक्त फारुख शेख धारेवर घेतले आणि त्यांनी महापालिकेचे अधिकारी अनिल पाटील यांना तात्काळ कार्यालयात बोलवा अशी मागणी केली,मात्र पाटील आले नाहीत.त्यामुळे मनसेने ठिय्या आंदोलन चालू केले.

मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले की, 'सहाय्यक आयुक्तांना माहिती नव्हतं असा अपघात झाला आहे, ही एकदम लाजीरवाणी गोष्ट आहे. दुपारी साडेबारा वाजले आहेत,काल रात्री ८ वाजता अपघात होऊन मृत्यू झाला आहे. सहायक आयुक्तांना येथील अधिकारी सांगतच नसतील येथे मृत्यू झालाय ते, ही शोकांतिका आहे.

'आमची मागणी हीच आहे की अनिल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. सरकार दहीहंडी या उत्साहाच्या वेळेला एकदिवसात जर अपघात होतात तर व त्याला साहसी खेळ म्हणून ठरवतात आणि त्यात अपघात झालेल्या मुलाला १० लाख रुपये दुसऱ्या दिवशी काढून देतात , तर हा मुलगा देखील एक साहसी चालक आहे. कारण दिव्यातील सगळे चालक आहेत, खड्यातून जातात यांनाही साहसी चालकांचा दर्जा मिळावा आणि त्या मुलाच्या कुटुंबाला १० लाखाची मदत सरकारने दयावी', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com