अहमदनगर : राज्य सरकारचा फटाके (Firecrackers) बंदीचा निर्णय जाहीर करणार असल्याचे समजताच या निर्णयाच्या विरोधात मनसेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. फटाके फोडूनच फटाके बंदीच्या निर्णयाचा विरोध मनसैनिकांनी केला आहे. (MNS activists oppose ban on firecrackers)
हे देखील पहा -
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) अनेक सण-उत्सवावर शासनाने निर्बंध घातले होते. आता कुठे राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना व राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असतांना, राज्य सरकारने जवळ-जवळ सर्वच निर्बंध उठविले आहेत. गेल्या 3-4 महिन्यांपासून रोजगार, उद्योग-धंदे रुळावर येत आहेत. दिवाळी (Diwali) सणात फटाके फोडणे हा महत्वाचा घटक असल्याने फटाके वाजविण्याला बंदी घालणे म्हणजे हे सरकार पुर्णत: हिंदू विरोधात काम करत असल्याचे मनसे सैनिक म्हणाले.
तसेच फटाक्याच्या व्यापारावरती अनेकांचे संसार आहेत, आज दिवाळी तोंडावर असतांना व्यापार्यांनी कर्ज काढून फटाक्यांची खरेदी केली आहे आणि अचानकपणे सरकार फटाक्यांवर बंदी घालत आहेत. पर्यावरणमंत्री आदित्यठाकरे (Aditya Thackeray) यांचा बालहट्ट पुरविण्याकरिता उध्दव ठाकरे,(uddhav thackeray) महविकास आघाडी सरकार MVA goverment असे निर्णय घेत असून जर उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना फटाक्यांचे प्रदूषण सहन होत नसेल तर दिवाळी होईपर्यंत त्यांनी परदेशात निघून जावे असा सल्ला ही नितीन भुतारे यांनी दिला आहे हा कोणता तुघलकी निर्णय म्हणावा. या निर्णयास आमचा विरोध आहे, आम्ही राज्यात फटाके वाजविणार जर त्यास विरोध झालाच तर संबंधित अधिकार्यांच्या दालनात फटाके उडवू असा इशारा देखील मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.