आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका...

सरकारने लॉकडाऊन मध्ये केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर मातोश्री समोर जाऊन बेशरमचे झाड लावणार आहे.
आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका...
आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका...SaamTv

अरुण जोशी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतात मात्र आज एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले आहे. MLA Ravi Rana's tongue slipped, criticism on Chief Minister

फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो हे सांगत असताना रवी राणा यांनी एमपीएससी चा विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने स्वप्निल लोणकर कुटुंबीयांना तात्काळ एक कोटी रुपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

हे देखील पहा -

फेसबूक लाईव्ह मध्ये राणा म्हणाले, गोरगरीब जनता शेतकरी व युवकांचे प्रश्न विचारणार्‍या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. स्वप्निल लोणकर या युवकाने फक्त एमपीएससी परीक्षा घेऊन सुद्धा मुलाखतीला न बोलावल्यामुळे आत्महत्या केली. या सरकारने लॉकडाऊन मध्ये केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर मातोश्री समोर जाऊन बेशरमचे झाड लावणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर संदेश जाईल आम्ही कितीही ओरडून ज्या माणसाला कळतच नाही असा बेशरम मुख्यमंत्री मी आयुष्यात कधीही पहायला नाही. बेशरमचे झाड लावल्या मुळे त्यांना काहीना काही फरक पडेल व ते राज्यातील जनतेला दिलासा देतील असे आक्षेपार्ह विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे.

आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका...
MPSC | परीक्षा २०१७ ची नियुक्त्या मात्र अजूनही प्रलंबित !

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात दरम्यान बारा आमदार निलंबित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार राणा यांनी विविध मागण्यांसाठी थेट विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले यावर अध्यक्षांनी निवेदनाचा स्वीकार केल्याने राणा यांनी राजदंड उचलून सभागृहाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी राणा यांनी माध्यमांसमोर येऊन सर्वसामान्यांचे विविध प्रश्न उपस्थित करून न्याय देण्याची मागणी केली होती. दरम्यान आज एका फेसबुक लाइव्ह मध्ये बोलताना आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. बोलण्याच्या ओघात त्यांनी हे आक्षेपार्ह विधान करून मातोश्री समोर बेशरमचे झाड लावणार असल्याचे जाहीर केले.

आमदार रवी राणा व शिवसेनेमधील संघर्ष जुना आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी माजी खासदार आनंदराव अडसूळ कंबर असल्याने शिवसेना आणि राणा दाम्पत्यामधील वाद जिल्ह्यासह राज्यातील जनतेने अनुभवला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा विविध प्रश्नांच्या आडून शिवसेनेला टार्गेट करण्याची संधी सोडत नसल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com