आमदार रत्नाकर गुट्टेंसह समर्थकांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल

जो काही प्रकार झाला आहे त्याचे सर्व व्हिडीओ त्यांनी स्वतः पोलीसांना दिले आहे.
Ratnakar Gutte
Ratnakar Gutte Saam TV

परभणी: गंगाखेड विधानसभेचे रासपचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्यावर एका महिलेने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या इतर 35 समर्थकांनी महिलेच्या शेतात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर आमदारांच्या समर्थकांनी महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. या संदर्भात महिलेच्या तक्रारी वरून गंगाखेड पोलिसात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे सहित इतर 35 जनांविरिद्ध मारहाण तसेच विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला आहे.

354 (ब) 324, 184, 147, 149, 323, 504, 506 आणि 135 बी.पी.अॕक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना डॉ.गुट्टे यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे, जी शेत जमीन अस्तित्वातच नाही आणि अशी काही घटना घडलीच नाही, जो काही प्रकार झाला आहे त्याचे सर्व व्हिडीओ त्यांनी स्वतः पोलीसांना दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com