Dahi Handi 2022 : दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करा; आमदार सरनाईक यांची शिंदे सरकारकडे मागणी

यंदा दहीहंडी (Dahi handi) उत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येऊ शकते. दरम्यान, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा सामावेश क्रीडा प्रकारात करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे.
pratap sarnaik
pratap sarnaik saam tv
Published On

रश्मी पुराणिक

ठाणे : कोरोना (Corona) संकाटाचे सावट असल्याने गेले २ वर्ष सर्वच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा शिंदे सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. त्यामुळे राज्यभरात २ वर्षांनी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व आयोजकांकडून यंदा दहीहंडी (Dahi handi) उत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येऊ शकते. दरम्यान, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा सामावेश क्रीडा प्रकारात करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. ( Dahi Handi News In marathi )

pratap sarnaik
निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही; माजी आमदाराचा राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना इशारा

आगामी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सदर मागणी केली. प्रताप सरनाईक म्हणाले, 'स्पेन देशात मानवी मनोरे रचणे हा खेळ खेळला जातो आणि त्यांचे खेळाडू जगभर त्यासाठी फिरतात. स्पेन पेक्षा चांगले मानवी मनोरे आपले गोविंदा पथके रचतात. त्यामुळे त्यांना क्रीडा प्रकारात अधिकृत समावेश करून खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली.

'दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात केल्यास गोविंदाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय प्रभावी होईल. क्रीडा प्रकारात दहीहंडी समाविष्ट झाल्यास शासकीय नोकरींमध्येही गोविंदाना आरक्षण मिळू शकेल. त्यात चांगले गोविंदा सरकारी नोकरीत कामाला लागतील. मुख्यमंत्री शिंदे हे नक्कीच याबाबत निर्णय घेतील. पुढील वर्षी क्रीडा प्रकारात सामावेश झाल्यास अधिकृतपणे वर्षभर याच्या स्पर्धा होऊ शकतात आणि अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून दहीहंडीला मान्यता मिळाल्यानंतर गोविंदा जगभर जाऊ शकतात. भविष्यात दहीहंडीचा समावेश ऑलिम्पिकमध्ये सुद्धा होईल, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी बोलताना व्यक्त केला.

pratap sarnaik
ED Raid: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ईडीची आणखी दोन ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वैभवातून दहीहंडी हा खेळ पुढे आला आणि लोकप्रिय झाला. आता क्रीडा प्रकारात दहीहंडीचा समावेश झाला तर गोविंदा जगभर जातील आणि महाराष्ट्राचे नाव त्यामुळे होईल. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यात उत्सव अधिक भव्य प्रमाणात साजरे करण्यास सुरुवात केली. दिघे साहेबांच्या नंतर एकनाथ शिंदे यांनीही टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव सुरुच ठेवला. आमच्या सारखेच तेही दहीहंडी उत्सव आयोजित करतात. त्यामुळे पुढील वर्षाच्या आत दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात झालेला असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोविंदाना अनोखी भेट देतील, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com