वर्षभरात एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही, CM एकनाथ शिंदेंवर ठाकरे गटाच्या आमदाराचा आराेप

शेतक-यांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत नसल्याची खंत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली.
mla kailas patil, eknath shinde, farmers, maharashtra government
mla kailas patil, eknath shinde, farmers, maharashtra governmentsaam tv
Published On

बालाजी सुरवसे

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना व राज्य सरकारला देण्यात आलेल्या विविध प्रश्नाच्या पत्रांवर उत्तर देण्यास वर्षभर वेळ मिळाला नसल्याचा आराेप आमदार कैलास पाटील यांनी केला. दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे आमदार पाटील यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदाेलन छेडण्याचा इशारा सरकारला दिला आहे. (Maharashtra News)

mla kailas patil, eknath shinde, farmers, maharashtra government
Loksabha Election 2024: आनंदित झालेल्या शरद पवारांनी शाहू महाराज यांच्या लाेकसभेच्या तिकिटाविषयी स्पष्ट सांगितलं (पाहा व्हिडिओ)

दरम्यान खरीप 2023 च्या अनुषंगाने अग्रीम नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना पत्र पाठवले आहे. जिल्ह्यातील बळीराजा हा संकटात सापडलेला असताना वारंवार राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करून देखील पत्राला उत्तर दिले जात नसल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.

mla kailas patil, eknath shinde, farmers, maharashtra government
NCP vs NCP : यापुढं काकांचा फाेटाे बॅनरवर वापरणार नाही! पुतण्याने दिली ग्वाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन

दरम्यान आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आमदार पाटील यांनी दिला.

यापुर्वी देखील आमदार कैलास पाटील यांनी शेतकरी सध्या अडचणीत असताना त्यांच्या पाण्यावरील कर दहा पट्टीने वाढवुन सुलतानी सरकारने शेतकऱ्यावर जुलुम चालविल्याची टीका राज्य सरकावर केली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com