Bindass kavya Found: बेपत्ता यूट्यूबर काव्या यादव सापडली! कुठे गेली होती? तिने घर का सोडलं? माहिती आली समोर

Youtuber Bindass kavya Found: याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Bindass kavya Found
Bindass kavya FoundInstagram/@bindass_kavya
Published On

औरंगाबाद: औरंगाबादमधून बेपत्ता झालेली (Aurangabad) प्रसिद्ध यूट्यूबर आणि इंटरनेट सेलिब्रिटी असणारी काव्या यादव (Youtuber Kavya Yadav) हिचा शोध लागला आहे. मध्य प्रदेशातील इटारसी ते भोपाळ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलिसांना काव्याचा शोध लागल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिली आहे. काल, शुक्रवारपासून काव्या यादव ही बेपत्ता होती. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. (Kavya Yadav Aurangabad News)

रागाच्या भरात सोडलं होतं घर

काव्या यादव ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी 363 नुसार गुन्हा दाखल केला होता. काव्या ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा संशय पोलिसांना होता. हा संशय खरा ठरला आहे. काव्या ही रागाच्या भरात काल, शुक्रवारी भर दुपारी घरातून निघून गेली होती. यानंतर तिच्या आई-वडिलांनी औरंगाबाद येथील छावणी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांची तपासाची चक्र फिरवत काव्याचा शोध सुरू केला होता. अखेर काव्या ही मध्य प्रदेशातील इटारसी ते भोपाळ रेल्वे स्थानकादरम्यान मिळाली असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली आहे. यावेळी ती रेल्वेने प्रवास करत होती. रेल्वे पोलिसांनी तिला खाली उतरवून घेतले आणि आता तिला औरंगाबादला आणण्यात येणार आहे.

'या' कारणामुळे काव्याला आला होता घरच्यांचा राग

मिळालेल्या माहितीनुसार घर सोडण्याआधी काव्याचे तिच्या आई-वडिलांसोबत वाद झाले होते. १६ वर्षीय काव्याला तिचे आई-वडील अभ्यासाच्या कारणावरुन ओरडले होते. त्यांनी काव्याचा मोबाईलही काढून घेतला होता. यामुळे काव्याला राग अनावर होऊन तिने थेट घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती शुक्रवारी, दुपारच्या सुमारास घरातून रागारागाने निघून गेली.

काव्याचा शोध लागल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी यूट्यूबवर लाईव्ह येत याबाबत माहीती दिली आहे. काव्याच्या आई-वडिलांनी यूट्यूब लाईव्ह करत काव्या सापडली असल्याची माहीती दिली आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. लवकरच काव्याला तिच्या आई-वडिलांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

कमी वयात काव्याने यूट्यूबवर यशस्वी भरारी घेतली आहे. काव्या यादवच्या यूट्यूब चॅनेलचे नाव बिंदास काव्या (Bindass Kavya) असे असून यूट्यूबर तिचे 4.33M मिलियन सबस्क्राईबर्स (subscribers) आहेत. काव्या ट्रॅव्हल आणि गेमिंग या विषयावर व्हिडिओ बनवते. काव्या यूट्यूबसह इन्स्टाग्रामवरही प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1M मिलियन फॉलोअर्स (followers) आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com