Sajjangad Leopard : सातारा (satara) जिल्ह्यातील किल्ले सज्जनगडावरील रामघळ परिसरातील भटकलेले बिबट्याचे बछडे आणि त्याच्या मादीची मंगळवारी रात्री उशिरा भेट झाली. ही भेट वन विभागाच्या (forest department) प्रयत्नांमुळे झाली. आई आणि बछड्याची (leopard cub) भेट ट्रॅप कॅमे-यात कैद झाली आहे.
साताऱ्याच्या किल्ले सज्जनगडावर सापडलेले बिबट्याचे बछडे आणि त्याच्या आईची आखेर भेट झाली आहे. बिबट्या मादीने त्याचे पिल्लू सुरक्षित अधिवासात नेले आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्यामध्ये आपल्या पछाड्याच्या शोधात त्या परिसरात आली. ही सर्व घटना ट्रम्प कॅमेरात कैद झाली आहे.
साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांचे सहकारी व पुणे बावधन येथील रेस्क्यूटीम आणि सह्याद्री पोट्रिकस फौंडेशन सातारा यांच्या कामगिरीला यश आले आहे. किल्ले सज्जनगडावर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान रामघळ परिसरात काही भटकंती करत असणाऱ्या युवकांना बिबट्याचे बछडे वाटेत खेळताना दिसले होते.
या युवकांनी (youth) बिबट्याच्या बछड्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पाेहचले. दरम्यान रात्री उशिरा बिबट्याचे बछडे आणि मादी यांची भेट घडवून आणण्यात सातारा वन विभागाला यश आले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.