Raj Thackeray On Missing Girls: मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढलं? राज ठाकरेंनी सांगितलं धक्कादायक कारण

Raj Thackeray Latest News:आज नाशकात पत्रकारांशी बातचीत करतांना त्यांनी या प्रश्नावर भाष्य केलं.
Raj Thackeray
Raj ThackeraySAAM TV

Political News: महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना देखील वाढताना दिसत आहेत. अशात आता या सर्वांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Politocal News)

राज ठाकरे यांनी मुली बेपत्ता होण्यामागचं मोठं कारण सांगितलं आहे. मुली गायब होण्यामागे सोशल मीडिया कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज नाशकात पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी या प्रश्नावर भाष्य केलं. तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर देखीस राज ठाकरे बोलले आहेत.

Raj Thackeray
Rs 2000 Exchange Last Date: बायबाय 2000 rs.; नोट बदलण्याची शेवटची तारीख डोक्यात फिट्ट करून ठेवा...

या सगळ्या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहेत. त्यावर ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे अनेक गोष्टींसाठी बुद्धीला चालना मिळते. हे काही नव्याने होत नाहीये. या आधी देखील अशा घटना घडल्यात. या आधी एका मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की, महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या. एकदा देऊन तर बघा मग असली प्रकरण घडतात का तेही समजेल, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामासाठी मोकळीक दिल्यास कोणत्याही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल. तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याचा छडा देखील लगेच लागले, अशा आशयाचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन ट्रक एकमेकांवर धडकताच घेतला पेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com