राष्ट्रवादीला पुढील पंधरा वर्ष आम्ही सत्तेत येऊ देणार नाही, दिवाळीत शंभुराज देसाईंनी फोडला राजकीय बॉम्ब

राजकीय मैदानात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे बॉम्ब फुटताना दिसत आहेत.
Sharad Pawar And Shambhuraj desai
Sharad Pawar And Shambhuraj desaisaam tv

मुंबई : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून जल्लोषाचं वातावरण आहे. परंतु, राजकीय मैदानात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे बॉम्ब फुटताना दिसत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर (NCP) ऐन दिवाळीत तोफ डागली आहे. राष्ट्रवादीला पुढील पंधरा वर्ष आम्ही सत्तेत येऊ देणार नाही, असा सणसणीत इशारा देसाई यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे. (Minister Shambhuraj Desai criticises Nationalist Congress Party)

Sharad Pawar And Shambhuraj desai
Rishi Sunak Britain New PM : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत. परंतु, तुमचं सरकार असताना लोकशाही राहिली आणि आमचं सरकार असताना ती संपली, असं असू शकत नाही. रामराजेंची टीका ही उद्वेगातुन आहे, खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी सत्तेपासून जास्त काळ लांब राहू शकत नाही. याच कारणामुळं त्यांची अगापाखड होत आहे. परंतु, आम्ही राष्ट्रवादीला पुढील पंधरा वर्ष सत्तेत येऊ देणार नाही. उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळी दौऱ्यांवरून आमच्यावर टीका करतात, त्यांनी त्यांचा चोवीस मिनिटांचा दुष्काळ दौरा तपासून पाहावा. त्यानंतर आमच्याबद्दल बोलावं.

Sharad Pawar And Shambhuraj desai
IND VS PAK: पाकिस्तान विरुद्ध झेल सोडला, ट्रोलर्स म्हणाले 'खलिस्तानी', अर्शदीप सिंगने 'असा' केला कमबॅक

दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शंभुराज देसाई यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली. पर्यावरणपूरक अशा या दिवाळीला देसाई यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं.यावेळी शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळामुळं मोठा‌ फटका बसला आहे. मात्र सरकारने याची पाहणी करुन मदत करण्याचं धोरण हाती घेतलं आहे.

जे शेतकरी निकषात बसत नाहीत, त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल याबाबत विचार केला आहे.महाराष्ट्र उज्वल महाराष्ट्र व्हावा, हा महाराष्ट्र देशात नंबर एक असावा, यासाठी आमचा प्रयत्न कायम राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com