Shambhuraj Desai: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मंत्री शंभुराज देसाई यांचे संकेत

Shambhuraj Desai On Cabinet expansion: शशिकांत वारसे प्रकरणाचा तपास सुरू आहे, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे असेही त्यांनी सांगितले.
Shambhuraj Desai On Cabinet expansion
Shambhuraj Desai On Cabinet expansionsaam tv

Shambhuraj Desai News: आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत. त्याचबरोबर विरोधकांच्या टिकेला आम्ही कामातून उत्तर देण्याचा ठरवलंय आणि त्या दृष्टीने आमचं काम सुरू असल्याचे ते म्हणाले. आता विरोधकांना आमचे कामच बोलेल, असे ते यावेळी म्हणाले.

सांगलीच्या विटा येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे, या प्रसंगी ते बोलत होते.

Shambhuraj Desai On Cabinet expansion
Maulana Mahmood Madani: जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांचं भाजप-RSS बद्दल मोठं विधान

शशिकांत वारसे प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे असे ते म्हणाले आहे. या प्रकणाच्या मुळाशी जाणे आणि हा खून कोणी केला, कुठल्या पार्श्वभूमीवर झाला आणि कोणी करायला लावला याचा तपास लागावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले.

तसेच कायदा हातात घ्यायचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याला शोधून काढून पोलीस खात्यामार्फत नक्की शिक्षा केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.

Shambhuraj Desai On Cabinet expansion
Breaking News : मुंबईच्या अंधेरीत धावत्या बेस्ट बसला अचानक आग; वाहनाचा झाला कोळसा

माझं खाते राज्याला उत्पन्न देणारं तिसऱ्या क्रमांकाचं मोठं खात आहे. मागील दोन वर्षे कोविडमध्ये गेल्यामुळे थोडा रेवेन्यू कमी झाला, तसेच गुन्हेगारी थांबली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं टार्गेट माझ्या विभागासमोर आहे. आता एक महिना दीड महिना शिल्लक आहे. मला जे उद्दिष्ट दिलेले आहे, त्यानुसार महाराष्ट्राची तिजोरी भरण्याचं काम माझ्या विभागामार्फत आम्ही नक्की करू असे देसाई म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com