विनायक मेटे यांच्या रूपाने संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला. सरकार कोणतेही असो ते आपल्या मागण्यांपासून दूर गेले नाहीत.
Vinayak Mete
Vinayak MeteSaam TV

मोबीन खान -

शिर्डी: शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाने एक संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असल्याची शोक संवेदना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) पहाटेच्या दरम्यान, मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला. मेटे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील विनायक मेटे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना ते म्हणाले, 'विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांची सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्त्व होते.

मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला. सरकार कोणतेही असो ते आपल्या मागण्यांपासून दूर गेले नाहीत. प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता हीच त्यांची समाजाच्या सर्व घटकामध्ये ओळख होती असंही विखे पाटील म्हणाले.

Vinayak Mete
Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटचा 'Big Bull' राकेश झुनझुनवाला यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

भाजप सरकारने अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. या स्मारकासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे विनायक मेटे हे अध्यक्ष होते. त्यांचा स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा सुरूच होता. जनसामांन्याशी बांधिलकी मानणारे नेतृत्व या दुर्दैवी घटनेन आपल्यातून हिरावून घेतले आहे. अशा शब्दात मंत्री श्री विखे पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com