MHT CET EXAM: पावसामुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी

मुसळधार पावसामुळे MHT CET ची परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे. तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
MHT CET EXAM: पावसामुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी
MHT CET EXAM: पावसामुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमीSaam Tv News
Published On

राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि वाहतुक सेवा बंद करावी लागली. यामुळे MHT CET ची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेला जाताच आलं नाही. परीक्षा देता आली नसल्यानं हे विद्यार्थी चिंतेत होते. मात्र पावसामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुसळधार पावसामुळे MHT CET ची परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे. तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. (MHT CET EXAM: Good news for students who could not take exams due to rain)

हे देखील पहा -

तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की. ''राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.'' असं दिलासादायक आश्वासान त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.

MHT CET EXAM: पावसामुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी
CET परीक्षा देण्यासाठी जात असलेले 150 ते 200 विद्यार्थी पुरामुळे अडकले

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं असून अनेक जिल्ह्यांत पावसाचा कहर पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात फार्मसी तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाच जाता न आल्यानं हे विद्यार्थी विवंचनेत होते, मात्र आता त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. लवकरच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com