भाजपच्या ऑपरेशनची आम्हाला सवय; 'मविआ' सरकार 5 वर्ष स्थिर राहील - अशोक चव्हाण

"मला माजी मंत्री म्हणू नका, कारण दोन तीन दिवसातच तुम्हाला कळेल"
भाजपच्या ऑपरेशनची आम्हाला सवय; 'मविआ' सरकार 5 वर्ष स्थिर राहील - अशोक चव्हाण
भाजपच्या ऑपरेशनची आम्हाला सवय; 'मविआ' सरकार 5 वर्ष स्थिर राहील - अशोक चव्हाणSaamTv
Published On

संजय राठोड

यवतमाळ : मी भविष्यकार नाही, कदाचित चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना भविष्य कळत असेल म्हणून त्यांनी वक्तव्य केली असतील. तसेच त्याच्या म्हणण्याचं रूप काही मला कळलं नाही मात्र भाजपच्या ऑपरेशनची (BJP Operation) आम्हाला आता सवय झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) स्थिर आहे तसेच पूर्ण 5 वर्ष काम करेल असा विश्वास कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Congress leader Ashok Chavan) यांनी व्यक्त केला आहे आज ते यवतमाळ मध्ये बोलत होते. (Mavia government will remain stable for 5 years-Ashok Chavan)

हे देखील पहा-

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी "मला माजी मंत्री म्हणू नका कारण दोन तीन दिवसातच तुम्हाला कळेल" असं वक्तव्य देहू येथे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशुन म्हणाले त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवरती अशोक चव्हाण यांनी त्यांना चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

भाजपच्या ऑपरेशनची आम्हाला सवय; 'मविआ' सरकार 5 वर्ष स्थिर राहील - अशोक चव्हाण
कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांचा हिंगोली दौरा!

तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) आणि शिवसेना नेते अनिल परबावरती (Anil Parab) केलेल्या आरोपांसंदर्भात ते बोलत होते. ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी आरोप सुरू केले आहेत ते योग्य नाही. लोकशाही मार्गाने सरकार चांगल काम करत आहे सरकारच्या कामात अडथळा निर्माण करणे योग्य नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच सरकार असो व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप करणे काम करू न देणे चुकीचे आहे. काहीही आरोप करायचं आणि बदनामी करावी हे उचित नाही आरोपात तथ्य असले पाहिजे तरच आरोप करावे अन्यथा करु नयेत असही ते म्हणाले.

दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) भूमिकेवरती त्यांना विचारलं असता निवडणूतिच्या तोंडावर राजकीय समीकरण बदलत असतात त्यातला हा भाग आहे तो त्यांचा विषय आहे असं ते म्हणाले.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com