मावळ : मावळच्या कामशेत जवळील पाथरगाव येथील गावठी दारू भट्टीवर कामशेत पोलिसांनी कारवाई करत सुमारे तीन लाख ७५ हजार रुपयांचे रसायन नष्ट केले. या संदर्भात पाच जणांवर गुन्हा (Maval News) दाखल केला आहे. (maval news liquor kiln destroyed Police arrested five persons)
पाथरगावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी अवैधरीत्या गावठी दारूची भट्टी सुरू करून गावठी दारूची निर्मिती व विक्री केली जात होती. याबाबतची माहिती कामशेत पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळाली होती. त्यानुसार पाथरगाव गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी छापा टाकला असता तेथे इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ असणा-या मोकळ्या जागेमध्ये लोखंडी व फायबरच्या बेरेलमध्ये अवैधपणे गावठी (Liquor) दारूसाठी लागणारे रसायन तयार करताना दिसुन आले.
पाच जण ताब्यात
विजय केसरीया राठोड, देविदास रमेश नानावत, रामदास मैनावत, सावन योगेश राठोड, रमेश भदीया हे यांना ताब्यात घेऊन गावठी दारूचे रसायन खाली ओतून देण्यात आले. पुढील तपास कामशेत पोलिस करीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.