Pavana Dam
Pavana DamSaam tv

पवना धरणातून ३५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग

पवना धरणातून ३५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग

मावळ : मावळ तालुक्यातील पवना धरण 97 टक्के भरले असून धरणामधून हायड्रो पद्घतीने 1429 क्युसेक व स्वंयचलित सहा दरवाजे उघडत त्यामधून 2120 क्युसेक असा एकूण 3549 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत (Maval) सोडण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. (Maval News Pavna Dam)

Pavana Dam
Girish Mahajan: थोडं शांत रहा...तू-तू, मैं-मैं करू नका; गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

पवना धरण (Pavana Dam) परिसरात मागील चोवीस तासात 61 मिमी पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून येणारे धबधबे व निचरा यामुळे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे पवना नदीची पाणी पातळी वाढली असून नदीपात्राच्या जवळ नागरिकांनी जाऊ नये; असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पवना धरणाची पाणी क्षमता 8.51 टीएमसी आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी, चिंचवड शहराला या धरणामधून पिण्यासाठी पाणी वापरले जाते.

धरणात ८.२७ टीएमसी साठा

धरणात आज मितीला 8.27 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याने नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तर पावसाचा जोर ओसरल्यास विसर्ग कमी करण्यात येईल असे शाखा अभियंता अशोक शेटे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com