शो म्हणून कुत्री-मांजरे संभाळणाऱ्यांना काय माहित शर्यतीचा बैल कसा सांभाळतात...

शो म्हणून कुत्री-मांजरे सांभाळून आणि आपल्या गाडीत शो ची वस्तू ठेवणाऱ्या 'पेटा'च्या अधिकाऱ्यांना काय माहिती शर्यतीचा बैल कसा सांभाळला जातो - चैतन्य महाराज वाडेकर
मावळ मधील हिंदकेसरी नाग्या बैलाचे एकोणीस ऑगस्टला वयाच्या एकोणीस व्या वर्षी दुःखद निधन झाले आणि आज त्याचा दशक्रिया विधी संपन्न झाला.
मावळ मधील हिंदकेसरी नाग्या बैलाचे एकोणीस ऑगस्टला वयाच्या एकोणीस व्या वर्षी दुःखद निधन झाले आणि आज त्याचा दशक्रिया विधी संपन्न झाला. दिलीप कांबळे
Published On

मावळ : शेतकऱ्याचा जवळचा मित्र म्हणजे बैल, शेतात राबताना त्याचा जोडीदार असतो तो म्हणजे बैल. अनेक वर्षांपासून जीवापाड जपलेल्या आपल्या मित्राचा अंत डोळ्यांसमोर होतो त्यावेळी मात्र शेतकऱ्याला अश्रू अनावर होतात. अशाच मावळ मधील एका शेतकऱ्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाला आणि ते संपूर्ण कुटुंबीय दुःखात बुडून गेलं. मावळ मधील हिंदकेसरी नाग्या बैलाचे एकोणीस ऑगस्टला वयाच्या एकोणीस व्या वर्षी दुःखद निधन झाले आणि आज त्याचा दशक्रिया विधी संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील गाडामालक उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचीही मोठी उपस्थिती होती.

हे देखील पहा -

मावळातील मामा-भाचे असणाऱ्या बैलांची जुगलबंदी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकीन पूर्वी जमत असत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे लाल टोपी. ही बैलजोडी घाटात शर्यतीला उतरताच एकच जल्लोष व्हायचा. बारा वर्षांपूर्वी नाग्या आणि त्याचा साथीदार शर्यतीला उतरले. वडगाव कासींबी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते या जोडीला पुरस्कार मिळाला. त्या दिवसापासून मावळ मधील गाडा मालकांची मान उंचावली गेली. कालांतराने शर्यती बंद झाल्या. पण नाग्या बैलाच्या खुराकामध्ये कोणताच खंड पडला नाही. हरभऱ्याचा कोरमा, पेंड, भुसा, अंडी, तूप असा त्याचा आहार रोजच्या रोज सुरूच होता. मुलाला सांभाळतो त्याप्रमाणे त्याचा सांभाळ करण्यात आला. मात्र 19 ऑगस्ट ला नाग्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र घरातील सदस्य गमावल्याच दुःख विधाते कुटुंबियांना झालं. आज अखेर हिंदकेसरी नाग्या ला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याचा दशक्रिया विधी करून एक स्मारक उभारण्यात आले आहे.

मावळ मधील हिंदकेसरी नाग्या बैलाचे एकोणीस ऑगस्टला वयाच्या एकोणीस व्या वर्षी दुःखद निधन झाले आणि आज त्याचा दशक्रिया विधी संपन्न झाला.
Breaking : बीडच्या अंबा सहकारी साखर कारखान्याची 25 एकर जमीन विकली !

बैलगाडी शर्यतीला चारशे वर्ष इतिहास आहे. बैलगाडा शर्यत ही खेळ किंवा मनोरंजन नाही ही शेतकऱ्यांच्या अस्मितेची परंपरा आहे. ज्या पेटा संस्थेने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली ही मंडळी सर्व शहरी भागात राहणारी आहे. यांचा कधीही बैलांसोबत संबंध आलेला नाही. यांनी कुत्रा आणि मांजर ही आपल्या गाडीत बसून एक शोभेची वस्तू ठेवली आहे. ज्यांना बैलगाडा विषयी काही आत्मीयता नाही. आम्ही शेतकरी बैलाचा एका मुलाप्रमाणे सांभाळ करतो असे मत चैतन्य महाराज वाडेकर यांनी हिंदकेसरी नाग्या बैलाला श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com