Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवलीय.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Patil Hunger StrikeSaam Tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून, तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत काही प्रमाणात खालवलीय. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत आहे. यातच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केलीय.

मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार
Congress Protest: राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही, वाचाळवीरांना लगाम घाला; काँग्रेसचं आंदोलन, भाजपला इशारा

याआधी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची आरोग्य विभागाच्या (health department) डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली होती. यावेळी जरांगे यांची शुगर डाऊन झाली होती आणि ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

दुसऱ्या दिवशीही जरांगे यांचा अशक्तपणा वाढला होता. त्यावेळीही त्यांना उपचार घेण्याची विनंतीडॉक्टरांनी केली. मात्र त्यासाठी त्यांनी डॉक्टरांना नकार दिला.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना हवं बिहार मॉडेल? जागावाटपाचाही दिला नवा प्रस्ताव, काय आहे सत्तेचं हे मॉडेल? वाचा...

राजरत्न आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

दरम्यान, आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राजरत्न आंबेडकर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात सत्ताधारी आणि विरोधकना प्रचाराला सुद्धा उतरता कामा नये अशी परिस्थिती महाराष्ट्रात उभी करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com