Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Narayan Gad: मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यापूर्वी मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर सध्या संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. ते उद्या दसरा मेळाव्यासाठी येणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहे.
Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On

Summary -

  • मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत बिघडली.

  • तापाने फणफणल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • दसरा मेळाव्यासाठी ते नारायण गडावर येणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे.

  • ते दसरा मेळाव्यासाठी रुग्णवाहिकेने येणार असल्याची माहिती समोर आली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक असताना त्यांची प्रकृती बिघडली. मनोज जरांगे हे तापाने फणफणले असून त्यांना उपचरासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते नारायण गडावर दसरा मेळाव्यासाठी येणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांचे सहकारी गंगाधरकाळ कोटींनी दिली आहे. प्रकृती खराब असल्यामुळे जरांगे रुग्णवाहिकेने नारायण गडावर येणार आहेत.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे. मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावरती छत्रपती संभाजी नगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार की नाही अशी चर्चा सुरू झाली होती.

मात्र जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 'मनोज जरांगे पाटील स्वतः दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. कोणीही संभ्रम बाळगू नये. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांची प्रकृती ठीक होईल. आम्ही नारायण महाराज चरणी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.', अशी माहिती त्यांनी दिली.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
Manoj Jarange : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शत्रू आहेत का? मनोज जरांगे यांनी मोजक्या शब्दात सांगितलं, VIDEO

मनोज जरांगे पाटील यांनी उपचार सुरू असताना देखील नारायण गडावरील दसरा मेळाव्याला आपण कुठल्याही परिस्थितीमधे जाणार. परंपरा खंडित होऊ देणार नाही असा निर्धार केला. दरम्यान, उपोषण, सततचा प्रवास यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती सतत खालावताना दिसत आहे. त्यांची तब्बेत मधून आधून खराब होत असते. सतत औषधोपचार, सलाईन सुरूच असते. मराठा आरक्षणासाठी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण केले होते. मागण्या मान्य केल्यानंतर सरकारने त्यांनी उपोषण मागे घेतले.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
Manoj Jarange: नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा; पूल वाहून गेल्याने अडचणी|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com