Nagpur News: कोरोना काळात वाढले बालविवाहाचं प्रमाण

कोरोनाच्या काळात नागपूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढले आहे. या काळात जिल्ह्यातील साधारणतः १०० पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता वर्तवलीय जाते आहे
Nagpur News:  कोरोना काळात वाढले बालविवाहाचं प्रमाण
Nagpur News: कोरोना काळात वाढले बालविवाहाचं प्रमाणSaam TV
Published On

नागपूर - कोरोनाच्या काळात नागपूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढले आहे. या काळात जिल्ह्यातील साधारणतः १०० पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता वर्तवलीय जाते आहे. ज्या बालविवाहाची गुप्त माहिती, महिला आणि बालकल्याण विभाग आणि पोलिसांना (Police) मिळाली, असे नागपूर जिल्ह्यातील १७ बालविवाह महिला व बालकल्याण विभागाने रोखले आहेत. (Many Child Marriages performed in Nagpur During Corona Period)

कोरोना (Corona) काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली. हातावर पोट असणाऱ्यांची तर परिस्थिती आणखीनच बिकट होती. अशात काही पालकांनी आपल्या मुलींची वयात येण्यापूर्वीच लग्न लावून दिले. महिला व बाल कल्याण विभागाला ज्या प्रकरणांची माहिती मिळाली ते बालविवाह रोखण्यात आले. मात्र, ज्यांची माहिती मिळाली नाही असे साधारणपणे 100 बालविवाह झाले असल्याचा अंदाज आहे.

Nagpur News:  कोरोना काळात वाढले बालविवाहाचं प्रमाण
महागाईचा फटका! एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ होणार

नागपूरच्या (Nagpur) एमआयडीसी भागात प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झालेल्या एका 12 वर्षीय मुलीचं तिच्या पालकांनी प्रियकरासोबत लग्न (Marriage) लावून दिलं. मात्र, वय कमी असल्यानं तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आता तज्ज्ञ डॅाक्टरांच्या देखरेखीत या १२ वर्षांच्या गरोधर मुलीचं समुपदेशन सुरु असून त्या १२ वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताबाबात तज्ज्ञांचा विचार सुरु आहे. कायद्याने ठरवून दिलेल्या वयापूर्वीच काही पालक मुलींची लग्न लावून मोकळं होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचं नुकसान त्या अल्पवयीन मुलींना सहन करावं लागतं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com