Maratha Reservation : 'मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी शपथ चांगली गोष्ट, पण...' मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार

Manoj Jarange-CM EKnath Shinde : आमच्या लेकरा-बाळांना हक्काचं आरक्षण मिळाल्याशिवाय आम्हाला थांबता येणार नाही.
Manoj Jarange- CM Eknath Shinde
Manoj Jarange- CM Eknath ShindeSaam TV
Published On

Jalna News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन काल (२४ ऑक्टोबर) संपली आहे. सरकारने दिलेली वेळ संपल्यानंतर आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणावर बसणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली.

याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ही चांगली गोष्ट आहे. पण आंदोलनापासून माघार घेता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा समाज आदर करतो. परंतु आम्ही त्यांचा मान राखत ३० दिवसांऐवजी ४० दिवसांची वेळ दिली होती. आम्ही त्यांना सकारात्मक मानतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange- CM Eknath Shinde
Accident News : दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या २ बसला शहापूरजवळ अपघात, २५ जण जखमी

मात्र आमच्या लेकरा-बाळांना हक्काचं आरक्षण मिळाल्याशिवाय आम्हाला थांबता येणार नाही. आमच्या मुलांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्हाला लढावं लागेल आणि आम्ही त्यासाठी लढणार आहोत. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आमच्या भूमिकेपासून आम्ही लांब जाणार नाही, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. (Live Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी शपथ घेतली त्याबाबत आम्ही आदर करतो. मराठा समजाला आरक्षण तुम्हीच देऊ शकता, याबाबत आमच्या मनात काहीही शंका नाही. आता आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी आमचा सन्मान करावा, ही आमची प्रामाणिक मागणी आहे. मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत, असं आम्हाला वाटतं.

आमचा आडमुठेपणा नाही की आरक्षण आताच द्या. मात्र हा वर्षानुवर्षांचा लढा आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन थांबवता येणार नाही. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावं, हीच आमची तुम्हाल कळकळीची विनंती आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Manoj Jarange- CM Eknath Shinde
Dussehra Melava : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला रुईकर आहे तरी कोण? ठाकरेंसाठी काय केलं होतं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना अचानक थांबत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला. मराठा आरक्षण द्यायला मी कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com